दुचाकीला धडक देऊन ट्रॅक्टर पुलाखाली कोसळला, २ ठार
By Admin | Updated: November 1, 2016 00:09 IST2016-11-01T00:09:29+5:302016-11-01T00:09:29+5:30
तालुक्यातील आमला ते भातकुली मार्गावरील ऋणमोचननजीक ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने...

दुचाकीला धडक देऊन ट्रॅक्टर पुलाखाली कोसळला, २ ठार
विचित्र अपघात : ट्रॅक्टरचालक फरार, एक जण गंभीर
दर्यापूर : तालुक्यातील आमला ते भातकुली मार्गावरील ऋणमोचननजीक ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात करून पळून जाताना ट्रॅक्टरचालकाचे संतुलन बिघडून हा ट्रॅक्टर आमला-नांदेड मार्गावरील पूलावरून खाली कोसळला. ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ट्रॅक्टर पुलाखाली कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ३० आॅक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.
अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव प्रवीण आंडे (रा. नांदरूण)असे तर ट्रॅक्टर पूलाखाली कोसळल्याने मरण पावलेल्या व्यक्तिचे नाव धम्मानंद देवीदास थोरात (२८, रा. आसरा) असे आहे. तर अनिल महादेव गुडधे हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पवन रामकृष्ण थोरात असे आरोपी ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.