तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर

By Ajay.patil | Published: July 20, 2023 12:12 AM2023-07-20T00:12:23+5:302023-07-20T00:13:01+5:30

पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.

two people died due to toxic alcohol in taroda two people were seriously injured | तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर

तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर

googlenewsNext

अजय पाटील, मोर्शी:  स्थानिक मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा धानोरा येथील विषारी दारू सेवन केल्याने मयाराम कुंजीलाल धुर्वे,जगलु फत्तेसिंग टेकाम हे आपल्या राहत्या घरी मृत्युमुखी पडले तर  सिताराम शेषराव परतेती व एक महिला  दारू पिल्याने अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना दारू सेवनानेच की अननोन सेवनाने विषबाधा झाली हे आज सांगता येणार नाही असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी सांगितले.त्यांना कशातून विषबाधा झाली हे रिपोर्टनुसार ठरविण्यात येईल.परतेती व एक महिला यांची प्रकृती  गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.

Web Title: two people died due to toxic alcohol in taroda two people were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.