होम आयसोलेशनमधील दोन रुग्णांना ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:22+5:302021-05-19T04:13:22+5:30
अमरावती : होम आयसोलेशनमधील संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे नरेडीनगर व कंवरनगर भागातील दोन ...

होम आयसोलेशनमधील दोन रुग्णांना ५० हजारांचा दंड
अमरावती : होम आयसोलेशनमधील संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे नरेडीनगर व कंवरनगर भागातील दोन रुग्णांना २५ हजार रुपये दंडाच्या नोटीस बजावण्यात आल्या. महापालिकेच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी केली. या रुग्णांनी त्यांच्या घरावर लावलेले फलक काढले होते. पथकाद्वारे तात्काळ तपासणी करून फलक पुनर्स्थापित करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार होम आयसोलेशनमध्ये नियमभंग करणाऱ्या रुग्णांवर कलम १८८ अन्वये तसेच साथरोग प्रसार नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच त्यांना गृह विलगीकरणामधून काढून संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. दंडात्मक रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करामध्ये जोडली जाणार असल्याचे या विभागाचे प्रमुख सचिन बोंद्रे यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्तांनी गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक व नियंत्रण कक्ष या दोन्ही यंत्रणांद्वारे गृह विलगीकरणाच्या अटी-शर्ती मोडणाऱ्या रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सचिन बोंद्रे, नीलेश सोळुंके, शिक्षक संचालकांनी मंगळवारी ही कारवाई केली.