मध्य प्रदेशातील कुख्यात दोन आरोपींना अमरावती न्यायालयात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:38+5:302021-02-05T05:26:38+5:30
अमरावती : चोरी व घरफोडीतील दोन कुख्यात आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांनी सोमवारी अमरावती न्यायालयात हजर केले होते. बब्लू ...

मध्य प्रदेशातील कुख्यात दोन आरोपींना अमरावती न्यायालयात हजर
अमरावती : चोरी व घरफोडीतील दोन कुख्यात आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांनी सोमवारी अमरावती न्यायालयात हजर केले होते. बब्लू सरदार व संगत सरदार (दोन्ही रा. पांढुर्णा) अशी आरोपीची नावे आहेत.
दोन्ही आरोपीविरुद्ध छिंदवाड्यासह अमरावती व वरुड येथेदेखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली. सदर आरोपी छिंदवाडा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. बब्लू सरदार, संगम सरदार यांच्याविरुद्ध छिंदवाडा येथे २०१८ येथे भादविंची कलम ३९५ अन्य गुन्हा दाखल असल्याची माहिती एएसआय राजेंद्र रघुवंशी यांनी दिली. सदर गुन्ह अटक केलेले दोन्ही आरोपी छिंदवाडा कारागृहात होते. सदर आरोपीविरुद्ध अमरावती व वरूड येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याने त्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अमरावती न्यायालयात सोमवारी दुपारी हजर केले होते. एएसआय राजेंद्र रघुवंशी, एक पोलीस हवालदार तसेच तीन शिपायांच्या बंदोबस्तात न्यायालयात मोठ्या पोलीस व्हॅनमध्ये आणण्यात आले होते.