दोन नवे राष्ट्रीय महामार्ग साकारणार

By Admin | Updated: October 6, 2015 00:33 IST2015-10-06T00:33:25+5:302015-10-06T00:33:25+5:30

अमरावती-वरूड-नागपूर आणि वरूड-वर्धा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री केले.

Two new national highways will come up | दोन नवे राष्ट्रीय महामार्ग साकारणार

दोन नवे राष्ट्रीय महामार्ग साकारणार

नितीन गडकरी : संत्रा, कृषी महोत्सवाचा थाटात समारोप
वरुड : अमरावती-वरूड-नागपूर आणि वरूड-वर्धा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री केले. येथे आयोजित राष्ट्रीय कृषी, संत्रा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
ना.गडकरी पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी जलशिवार अभियान राबविल्यास २४ तास पाणी उपलब्ध राहील. शेतीकरिता लागणारी वीजसुध्दा २४ तास देऊ, कृषी मालापासून मिथेनॉल, इथेनॉल तयार होते. याकरिता शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले. याप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.रामदास तडस, आ.अनिल बोंडे, आ.आशिष देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, पूर्ती ग्रुपचे सुधीर दिवे, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य निशांत गांधी, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्ष सरिता खेरडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जयंत डेहनकर, किरण पातुरकर उपस्थित होते.
आ. अनिल बोंडे यांनी यावेळी ना.गडकरींसमोर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून संत्र्याला राजाश्रय देण्याची जाहीर मागणी केली.
संचालन अमोल कोहळे, इंद्रभूषण सोंडे तर आभार वसुधा बोंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

उशिरा पोहोचल्याबद्दल दिलगिरी
रविवारी सायंकाळी ५ वाजताची कार्यक्रमाची नियोजित वेळ असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी तब्बल तीन तास उशिरा वरूडला पोहोचले. त्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी ताटकळले होते. परंतु कार्यक्रमस्थळी पोहोचताच ना. गडकरींनी उशिरा पोहोचल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव
कृषी, संत्रा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी, संत्रा उत्पादक, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Two new national highways will come up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.