युवकाकडून दोन देशी पिस्टल, काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST2020-12-17T04:40:34+5:302020-12-17T04:40:34+5:30

(फोटो जे-१६-मालकर ) अमरावती : पिस्टल घेऊन वावरणाऱ्या एका आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी सापळा रचून पांढरी हनुमान मंदिर परिसरातून मंगळवारी ...

Two native pistols, cartridges seized from youth | युवकाकडून दोन देशी पिस्टल, काडतूस जप्त

युवकाकडून दोन देशी पिस्टल, काडतूस जप्त

(फोटो जे-१६-मालकर )

अमरावती : पिस्टल घेऊन वावरणाऱ्या एका आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी सापळा रचून पांढरी हनुमान मंदिर परिसरातून मंगळवारी रात्री अटक केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन देशी पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळून आले.

जीशान अहमद मोहम्मद फारूख (२८, रा. अन्सारनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३, २५ शस्त्र कायदा, सहकलम १३५ महाराष्ट्र पोेलीस कायदानुसार गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, आरोपीला न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, परिमंडळ १ चे उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, एपीआय महेश इंगोले, पोलीस जमादार नरेंद्र ढोबळे, सुभाष पाटील, गणेश तंवर, जहीर शेख रणजीत गावंडे, राज देवीकर, विशाल वाकपांजर आदींच्या पथकाने केली.

Web Title: Two native pistols, cartridges seized from youth