शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत फिल्मीस्टाईल थरार... हवेत गोळीबार; बंदुकीच्या धाकावर मुलीला पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 13:54 IST

दुचाकीवर आलेल्या तरुणांनी लग्नसमारंभातून तरुणीला जबरदस्तीने ओढले. यावेळी नातेवाईकांनी विरोध केला असता हवेत गोळीबार करत तिला बाईकवरून पळवून नेले.

अमरावती : लग्नसमारंभाची धावपळ.. जिकते-तिकडे लगबग सगळं घर रोषणाईने सजलेलं सगळ सुरळीत सुरू असताना दोन तरुण आले व अचानक हवेत गोळीबार झाला आणि लग्नमंडपातील लोक हादरून गेले. एका प्रेमवेड्याने बंदुकीच्या धाकावर नातेवाईकांच्या डोळ्यादेखत तरुणीला जबरदस्तीने बाईकवरून पळवून नेले.

ही थरारक फिल्मीस्टाईल घटना अमरावतीतील बालाजी प्लॉट या उच्चभ्रू वस्तीत सोमवारी (दि. ७) रात्रीच्या सुमारास घडली. सदर तरुणी कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे आली होती. घरात लग्नसमारंभ असल्याने सर्वत्र तयारी सुरू होती. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन तरुण तेथे आले. त्यांनी तरुणीला समारंभातून जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नातेवाईकांनी प्रतिकार केला असता एका तरुणाने त्याच्या जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या प्रकाराने नातेवाईक हादरून गेले. नातेवाईक घाबरल्याचे पाहून त्या दोघांनी तिला जबरदस्तीने बाईकवर बसवले व नागपूरच्या दिशेने पळून गेले.  

नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे अपहरणकर्त्याचे आणखी दोन साथीदार नांदगावपेठ टोलनाक्यावर त्यांची वाट पाहत होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवत दोघांना पकडले असून इतर आरोपी व त्या तरुणीचा शोध सुरू आहे. या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणAmravatiअमरावतीPoliceपोलिस