ट्रक उलटून दोन ठार, चार जखमी
By Admin | Updated: July 10, 2014 23:19 IST2014-07-10T23:19:46+5:302014-07-10T23:19:46+5:30
भरधाव ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमरावती-चांदूरबाजार

ट्रक उलटून दोन ठार, चार जखमी
टाकरखेडा संभू : भरधाव ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमरावती-चांदूरबाजार मार्गावरील नांदुऱ्याजवळ घडला. अपघातातील चारही गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये राजेंद्र केशव मेश्राम (३५ रा. नांदुरा), प्रभा रामराव मालोडे (३० रा. नांदुरा)समावेश आहे. जखमींमध्ये नर्मदा राजेंद्र मेश्राम(३२),ज्योती श्रीकृष्ण शेंडे(३२),शारदा गजानन भारसाकळे (३०),रंजना संतोष इंदूरकर(४०) यांचा समावेश आहे. ट्रक क्रं.एम.एच.२७-एक्स-५६३ हा पाचशे पोते सिमेंट घेऊन अमरावतीहून-वरुडकडे जात होता. चालकाचे संतुलन बिघडल्याने तो रस्त्याच्या कडेला कोसळला. वलगाव पोलिसांनी पंचनामा करून ट्रक चालक अजय रामदास तायवाडे (२० रा. वरुड) याला अटक केली आहे. (वार्ताहर )