दोन घटनांत चार दुचाकींसह दोन आरोपींना अटक
By Admin | Updated: December 4, 2015 00:27 IST2015-12-04T00:27:25+5:302015-12-04T00:27:25+5:30
शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेतील दोन आरोपींकडून चार दुचाकी जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले.

दोन घटनांत चार दुचाकींसह दोन आरोपींना अटक
कारवाई : शहरात नाकाबंदी, दुचाकी जप्त
परतवाडा : शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेतील दोन आरोपींकडून चार दुचाकी जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले. बुधवारी सायंकाळी ही कारवाही करण्यात आली.
शे. समीर शे. सलीम (३०, रा. ठाकुर कॉलनी, परतवाडा) व शे. अबरार शे. इस्माईल (३२, रा. खरपी) असे दुचाकीसह अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. देवेंद्र दुर्गाप्रसाद तिवारी (३५, रा. संतोषनगर, परतवाडा) यांच्या मालकीची दुचाकी २५ नोव्हेंबर रोजी चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. यावर परतवाडा पोलिसांनी शे. समीर शे. सलीम (रा. ठाकूर कॉलनी) याला ताब्यात घेतले असता एमएच २७ व्ही. ६४९६ ही दुचाकी त्याचेकडून जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
परतवाड्यात दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने ठाणेदार किरण वानखडे यांनी बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली होती. त्यादरम्यान खरपी येथील शे. अबरार शे. इस्माईल चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची टीप मिळाली. बैतूल स्टॉप येथे नाकाबंदीदरम्यान अबरार दुचाकी एमएच २७ झेड २३५९ चालविताना आढळून आला. कागदपत्र नसल्याने पोलिसांनी त्याला तपासात घेतले असता त्याने हिरो होंडा कंपनीच्या अधिक दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.