धनोडी येथे आगीत दोन घरे भस्मसात!

By Admin | Updated: May 9, 2014 00:56 IST2014-05-09T00:56:36+5:302014-05-09T00:56:36+5:30

नजीकच्या धनोडी येथे गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अचानक दोन घरांना आग लागली. यामध्ये दोन्ही घरातील साहित्य बेचिराख झाले. या आगीत मोठय़ा प्रमाणावर नुकसानझाले.

Two houses were set on fire in Dhanbadi! | धनोडी येथे आगीत दोन घरे भस्मसात!

धनोडी येथे आगीत दोन घरे भस्मसात!

अनर्थ टळला : नागरिकांची समयसुचकता
वरुड : नजीकच्या धनोडी येथे गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अचानक दोन घरांना आग लागली. यामध्ये दोन्ही घरातील साहित्य बेचिराख झाले. या आगीत मोठय़ा प्रमाणावर नुकसानझाले. नागरिकांची सतर्कता, वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविल्याने संभाव्य अनर्थ टळला.
धनोडी येथील वॉर्ड क्र.२ मध्ये मालखेड रस्त्यावरील दोन घरांना आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. संपूर्ण घर आणि गुरांचा गोठा जळून खाक झाला. घरावरुन गेलेल्या विद्युत तारांनासुध्दा आगीची झळ बसली. पथदिवासुध्दा जळाला. वेळीच धनोडीचे ग्रामसेवक शेख यांनी पाणीपुरवठा सुरुकेल्याने नागरिकांनी नळाचे पाणी टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. या आगीत शेख हुसेनभाईआणि सुभाष कौराईक यांचे घर भस्मसात झाले. घटनास्थळावर वरुड अग्निशमन दलाचे कृष्णराव खोडस्कर, शेंदूरजनाघाटचे बेलसरे उपस्थित होते. ही आग मद्यपीच्या मनमानीमुळे लागल्याची चर्चा आहे. त्याआधारे पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. नगराध्यक्ष गोरडेंची तत्परता
■ आगीची माहिती मिळताच शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष सुभाष गोरडे यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यांनी स्वत: घटनास्थळ गाठले आणि अग्निशामक दलाला तातडीने पाचारण केले.

Web Title: Two houses were set on fire in Dhanbadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.