चांदूररेल्वे येथे दोन हॉटेलला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST2021-02-26T04:17:29+5:302021-02-26T04:17:29+5:30
चांदूर रेल्वे : हॉटेलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने येथील दोन हॉटेल संचालकांना दंड ठोठावण्यात आला. पालिकेच्या मुख्याधिकारी मेघना वासनकर ...

चांदूररेल्वे येथे दोन हॉटेलला दंड
चांदूर रेल्वे : हॉटेलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने येथील दोन हॉटेल संचालकांना दंड ठोठावण्यात आला. पालिकेच्या मुख्याधिकारी मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर परिषद व पोलीस विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. बुधवारी जय भोले स्विट काॅर्नर व अंबिका स्विट कॉर्नर या दोन हॉटेलसह मास्क न घालणाऱ्यांविरूध्दसुध्दा कारवाई करण्यात आली. यात एकूण ८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत अभियंता कुकडकर, लिपिक राहुल इमले, आरोग्य निरीक्षक नितीन इमले, कर निरीक्षक विजय रताळे, लिपिक शिर्के, कर्मचारी पंकज इमले, मनीष कनोजे, बंडू कर्से, वाहतुक पोलीस कर्मचारी अमर काळे व भूषण वंजारी यांचा समावेश होता.