शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

दोन गटात मारहाण, पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

क्षुल्लक कारणावरून घरात शिरून वृद्धेला थापड मारली. म्हणून दोन गटांत मारहाण झाली, याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांवरच दोन्ही गटांतील ३० ते ४० जणांनी दगडफेक करून जीवघेणा हल्ला चढविला. यात एका पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान बेलपुऱ्यात घडली.

ठळक मुद्देबेलपुऱ्यातील घटना : पीआयसह दोन कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्षुल्लक कारणावरून घरात शिरून वृद्धेला थापड मारली. म्हणून दोन गटांत मारहाण झाली, याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांवरच दोन्ही गटांतील ३० ते ४० जणांनी दगडफेक करून जीवघेणा हल्ला चढविला. यात एका पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान बेलपुऱ्यात घडली.दगडफेकीत पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पोलीस जमादार राजेश राठोड, पोलीस शिपाई संतोष विघे हेसुद्धा जखमी झाले. पोलिसांवर दोन्ही गट एकत्र येऊन दगडफेक केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, एसीपी सुहास भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह दंगा नियंत्रण पथक, क्यूआरटी पथक, तसेच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व आरोपींना तातडीने अटक केली. फिर्यादी पोलीस जमादार राजेश राठोड यांच्या तक्रारीवरून दगडफेकीतील आरोपी सागर तंबोले (२८), राज तंबोले (३१), ऋतिक तंबोले (२०), शुभम तंबोले (२१), विजू तंबोले (४३), शिवा तंबोले (२३), शंकर मदने (३८), अमित धनाडे, शुभम धनाडे (२०), जुगल मदने (२१), जितू तंबोले (२५), गोपाल माहुरे (४४), श्याम तंबोले (५१), रामेश्वर माहुलकर (५९), अशोक तंबोले (४८)सह ३० ते ४० जणांवर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३५३, ३३२, ३३३, ५०४, ५०६, १८८, २६९, सहकलम १३५, (मपोका)नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे करीत आहे.फिर्यादी २० वर्षीय मुलगी (रा. बेलपुरा) यांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल महादेव माहुरे (३८), संजय महादेव माहुरे (४३, सर्व रा. बेलपुरा) विरुद्ध भादंविच्या कलम ३२३, २९४, ४४८ अन्वये गुन्हा नोंदविला. घरात शिरून अश्लील शिवीगाळ करून वृद्धेला थापड मारल्याची तक्रार फिर्यादीने नोंदविली. दुसºया गटातील जखमी फिर्यादी अमोल महादेवराव माहुरे (रा. बेलपुरा) यांच्या तक्रारीवरून आरोपी गजानन मन्साराम मदने, शंकर मन्साराम मदने, जुगल गजानन मदने, अमित दिलीप धनाडे, शुभम दिलीप धनाडे, ऋतिक रवि मंडवे (सर्व रा. बेलपुरा) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, १८८, २६९ अन्वये गुन्हे नोंदविले. फिर्यादीसोबत नालीच्या कारणावरून सकाळी वाद झाला होता.पोलिसांत तक्रार का दिली या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपीने फिर्यादीला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.संचारबंदीतही दगडफेक'लॉकडाऊन' व संचारबंदी असतानाही राडा झाल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले असून, रात्रभर आरोपींना धरपकड करणे सुरू होते. आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आले आहे. सोमवारी रात्री घटनास्थळावर दोन पोलीस उपनिरीक्षक व आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस