राजापेठ हद्दीतून दोन मुुली पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:18+5:302021-06-03T04:10:18+5:30
0000000000000000000000000 एमआयडीसीतून प्लास्टिकचे ड्रम लंपास अमरावती : एमआयडीसीतील नॅशनल पेस्टीसाईस ॲन्ड केमिकल या कंपनीच्या आवारातून चोरांनी ३० हजार ...

राजापेठ हद्दीतून दोन मुुली पळविल्या
0000000000000000000000000
एमआयडीसीतून प्लास्टिकचे ड्रम लंपास
अमरावती : एमआयडीसीतील नॅशनल पेस्टीसाईस ॲन्ड केमिकल या कंपनीच्या आवारातून चोरांनी ३० हजार रुपये किमतीचे प्लास्टिकचे ड्रम लंपास केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. विनीत अरुण श्रीराव (४२) याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000000
बेनाम चौकात तरुणीचा विनयभंग
अमरावती : एका मुलीचा पाठलाग करून तिला प्रेम संबंध ठेवण्यासाठी धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुध्द राजापेठ पोलिसांनी मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. निखिल ज्ञानेश्वर गिरी (२४ रा. छदानीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी आरोपी निखिलला चार वर्षांपासून ओळखते. परंतु तो पाठलाग करून प्रेमसंबंधासाठी तिला धमक्या देत होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली.
0000000000000000000000000000
बुरखाधारी महिलांनी चोरले दागिने
अमरावती : दोन बुरखाधारी महिलांनी खरेदी करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मोची गल्लीत घडली. महिलेच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी दोन अनोळखी बुरखाधारी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.