भाच्याच्या वाढदिवसाला जाणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:52+5:302020-12-27T04:10:52+5:30
भातकुली रेणुकापूर (धामणगाव रेल्वे) : भाच्याचा वाढदिवस साजरा करून दुचाकीने परतत जाताना विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ...

भाच्याच्या वाढदिवसाला जाणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू
भातकुली रेणुकापूर (धामणगाव रेल्वे) : भाच्याचा वाढदिवस साजरा करून दुचाकीने परतत जाताना विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री विटाळा परिसरात घडली. अक्षय श्रावण बोरकर (२०) व रोशन बंडूजी तिघरे (२७, दोघेही रा. पवनार) अशी मृतांची नावे आहेत.
धामणगाव तालुक्यातील अशोकनगर येथील आपल्या भाच्याचा वाढदिवस करून एमएच यू ९५७२ या दुचाकीने गावाकडे परतत असताना विटाळा वृद्धाश्रमाजवळ औरंगाबादहून नागपूरकडे जाणाºया एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. दोघे २०० फूट अंतरावर जाऊन पडले. अक्षय हा जागीच ठार झाला. सोबती असलेल्या रोशन याला सावंगी येथे दवाखान्यात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.