अचलपुरात कोरोनाचे दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:59+5:302021-03-10T04:14:59+5:30
अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी ७९ वर्षीय कोरोना संक्रमित महिला अचलपूर येथील ट्रामा केअर युनिटमध्ये उपचारार्थ दाखल होती. उपचारादरम्यान ८ ...

अचलपुरात कोरोनाचे दोन मृत्यू
अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी ७९ वर्षीय कोरोना संक्रमित महिला अचलपूर येथील ट्रामा केअर युनिटमध्ये उपचारार्थ दाखल होती. उपचारादरम्यान ८ मार्चला ट्रामा मध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. या दोन मृत्यूबरोबरच अचलपूर तालुक्यातील सावळापूर येथील ५२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा कोविड रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. यामुळे सोमवारी तालुक्यात एकाच दिवशी तीन मृत्यू घडले.
परतवाडा येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाचा ७ मार्चला जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. ४ मार्चला बेगमपुरा (अचलपूर) येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा, तर ३ मार्चला अचलपूर शहरातील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाला.