पाळा मार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार
By Admin | Updated: March 28, 2015 00:12 IST2015-03-28T00:12:21+5:302015-03-28T00:12:21+5:30
दुचाकी आणि ट्रॅक्टरची अमोरासमारो जबर धडक झाली. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. मोर्शी

पाळा मार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार
मोर्शी : दुचाकी आणि ट्रॅक्टरची अमोरासमारो जबर धडक झाली. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. मोर्शी ते पाळा या मार्गावर ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
समली तेजू युवनाते (६२, रा. सलम, ता. मुलताई) आणि तिचा नातू दिनेश बिरजू आहाके (३०, रा पाळा) अशी मृतांची नावे आहेत.
समली तेजू युवनाते या तिच्या पाळा येथील मुलीकडे आल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी त्यांचा नातू दिनेश आहाके याने तिला मोटार सायकल एमपी-४८ एमबी १३९० वर बसवून मोर्शी येथे डॉक्टरकडे नेले होते. डॉक्टरला तब्येत दाखविल्या नंतर हे दोघेही पाळा येथे मोटार सायकलने परत येत असतांना विरुध्द दिशेने मोर्शीकडे येत असलेल्या ट्र्र्रॅक्टर एमएच २७ एफ ८१३५ ची त्यांना धडक लागली. या धडकेत दोघेही मोटार सायकल वरुन फेकल्या गेले. त्यात समली युवनाते हीचे घटनास्थळीच निधन झाले. गंभीर जखमी झालेल्या दिनेश आहाके याला येथील उपजिल्हा रुग्नालयात दाखल करुन प्रथमोपचार करण्यात आले आणि त्याला अमरावती येथील जिल्हा रुग्नालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी आरोपी टॅ्र्र्रक्टर चालक सहदेव मरकाम, रा. भीवकुंडी याला अटक केली.