दोन दिवसानंतर रेल्वे गाड्या पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:08 IST2019-07-29T23:08:29+5:302019-07-29T23:08:50+5:30
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा तास उशिराने ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचली.

दोन दिवसानंतर रेल्वे गाड्या पूर्ववत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा तास उशिराने ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचली.
मुंबईहून अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, कुर्ला- हावडा शालीमार एक्सप्रेस, मुंबई- हावडा सुपरफास्ट, मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीब रथ, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आदी विदर्भात येणाºया रेल्व गाड्या सोमवारपासून पूर्ववत झाल्या आहेत. गत दोन दिवसांपूर्वी मुंबई जलमय झाल्यामुळे मुंबई मार्गे जाणाºया बहुतांश गाड्या विलंबाने धावल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना आठ ते १० तास उशिराने मुंबई गाठावी लागली, हे विशेष.
वेधशाळेने पुन्हा दोन दिवसांनी मुसळधार पाऊस असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विदर्भातून मुंबई, पुणे, अहमदाबाद मार्गे जाणाºया गाड्यांना विलंबाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता रेल्वे विभागाने वर्तविली आहे. मुंबई मार्गे जाणाºया गाड्यांना विलंबाचा फटका बसला असला तरी भुसावळ-नागपूर, अमरावती, वर्धा आणि बल्लारशा दरम्यान धावणाºया पॅसेजर गाड्या वेळेवर धावल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.