आरटीई आॅनलाईन प्रवेशासाठी दोन दिवस
By Admin | Updated: February 24, 2017 00:19 IST2017-02-24T00:19:42+5:302017-02-24T00:19:42+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे आॅनलाईन अर्ज सादर

आरटीई आॅनलाईन प्रवेशासाठी दोन दिवस
पालकांची लगबग : २५ फेब्रुवारी डेडलाईन
अमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे आॅनलाईन अर्ज सादर करण्यास गुरूवार ९ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ही मुदत संपणार आहे.
अर्ज भरण्यासाठी आॅनलाईन असलेल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण विभागाकडे पाच हजारांचेवर अर्ज प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. आरटीईनुसार या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी राज्यस्तरावरून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरूवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात सुरू झाले आहे. पालकांना आॅनलाईन अर्ज सादर करताना अडचणी येऊ नयेत, म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी मदत केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी बालकांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. शाळेत बालकांची निवड झाल्यास एसएमएसने पालकांना माहिती दिली जाईल. संकेस्तथळावर यादी लावल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)