गोठ्यातून दोन गाई लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST2021-09-25T04:12:25+5:302021-09-25T04:12:25+5:30

घरातील २० हजारांचा ऐवज लंपास मोर्शी : पत्नीसमवेत शेतात गेलेल्या सुभाष फकीरजी ठाकरे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून कपाटातील ...

Two cow lampas from the barn | गोठ्यातून दोन गाई लंपास

गोठ्यातून दोन गाई लंपास

घरातील २० हजारांचा ऐवज लंपास

मोर्शी : पत्नीसमवेत शेतात गेलेल्या सुभाष फकीरजी ठाकरे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून कपाटातील २० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही २३ सप्टेंबर रोजी राधाकृष्ण कॉलनीत उघड झाली. तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

सोयाबीन विक्रीतून आलेली रक्कम लंपास

मोर्शी : सोयाबीन विक्रीतून मिळालेले ३८८०० रुपये सुतळीच्या कट्ट्यात बांधून आणतात ढाब्यावर जेवणास बसले असता, कुणीतरी लंपास केले. ही घटना सिंभोरा मार्गावरील राजवाडा हॉटेलमध्ये २३ सप्टेंबर रोजी घडली. प्रज्ज्वल राजेंद्र डोळस यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

पाणी भरण्यास मनाई केल्याने मारहाण

तिवसा : बोअरचे पाणी भरण्यास मनाई केल्याने शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना स्थानिक आरती मेडिकलसमोर २३ सप्टेंबर रोजी घडली. बाळू फकीरजी लेवटे यांच्या तक्रारीवरून विजय जानराव नेमाडे (३५, शिवाजी चौक) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

शेत मोजणीवरून इसमाला मारहाण

माहुली : शेताच्या मोजणीकरिता आलेल्या भुमिअभिलेख कर्मचाऱ्यांना कोर्टाचे आदेश दाखवून परतविल्याने मोजणी का रोखली असे म्हणून इसमाला तिघांनी काठी व धारदार शस्त्रांनी मारहाण केली. ही घटना २३ सप्टेंबर रोजी देवरी येथे घडली. भाऊसाहेब राजाराम राऊत (५२, देवरी) यांच्या तक्रारीवरून माहुली पोलिसांनी बाबूराव राऊत, संतोष राऊत, नीलेश राऊतविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Two cow lampas from the barn