शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात भरधाव कारची दोन रोहींना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 14:32 IST

अमरावतीवरून परतवाडाकडे येणाऱ्या भरधाव कारने बोरगावपेठ नजीक रस्ता ओलांडून जात असलेल्या तीन वर्षीय दोन रोहींना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देदोन्ही रोही ठारअमरावती महामार्गावरील बोरगाव नजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीवरून परतवाडाकडे येणाऱ्या भरधाव कारने बोरगावपेठ नजीक रस्ता ओलांडून जात असलेल्या तीन वर्षीय दोन रोहींना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जोरदार धडक दिली. यात दोन्ही रोही जागेवरच ठार झाल, तर कारचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती आहे.चालक सतीश बहादुरे (रा. साईनगर) हा किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तो अचलपूर येथे महावितरणमध्ये कार्यरत सुनीता शंकर इंगळदार, वनिता दीपक हिंगमिरे, संकेत देविदास यादव (सर्व रा. अमरावती) यांना घेऊन परतवाडा येत असताना हा अपघात झाला. एमएच २७ बीव्ही ९३१५ क्रमांकाच्या कारने अमरावतीवरून हे महावितरणचे कर्मचारी कार्यालयात हजर राहण्यासाठी निघाले होते. चालक सतीश बहादुरे (रा. साईनगर, अमरावती) याची भरधाव कार रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या रोहींना धडकली. त्यात रोही घटनास्थळीच ठार झाले, तर कारचे बोनेट चेंदामेंदा झाले होते.दरम्यान, अपघातप्रकरणी आसेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. रोहीच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी सांगितले.पोलीस आणि वनाधिकाऱ्यांनी केला पंचनामासदर घटनेचा पंचनामा आसेगाव पोलीस व परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे, वनपाल बाबाराव झांबरे, वनरक्षक एस.व्ही. भोंडे यांनी केला. नर-मादीची ही जोडी तीन वर्षांची होती. परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असल्याने अपघातात वन्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवAccidentअपघात