एकाच रात्री दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST2021-04-21T04:13:43+5:302021-04-21T04:13:43+5:30

तिवसा : तालुक्यातील सातरगाव येथील दोन घरी धाडसी चोरीच्या घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्या. पोलीस माहितीनुसार, येथील नीलेश ...

Two burglaries in one night | एकाच रात्री दोन घरफोड्या

एकाच रात्री दोन घरफोड्या

तिवसा : तालुक्यातील सातरगाव येथील दोन घरी धाडसी चोरीच्या घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्या. पोलीस माहितीनुसार, येथील नीलेश मोडक व भालचंद्र चवरे यांच्या घरी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अडीच ग्रॅम सोने, रोख रक्कम असा एकूण २५ हजारांच्या मालावर हात साफ केला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील बहुतांश लोक हे माडीवर झोपायला जातात. मोडक व चवरे हे दोन्ही कुटुंब गच्चीवर झोपायला गेले असता, अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व नीलेश मोडक यांच्या घरातून अडीच ग्रम सोने, आठ हजार रुपये रोख रक्कम, तर भालचंद्र चवरे यांच्या घरून १३ हजार रुपये असा एकूण २५ हजारांचा माल दोन्ही घरफोडीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. फिर्यादी नीलेश मोडक यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास तिवसा पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Web Title: Two burglaries in one night