एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा
By Admin | Updated: May 11, 2014 22:12 IST2014-05-11T21:43:47+5:302014-05-11T22:12:18+5:30
ऑटोरिक्षा जप्त

एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा
अकोला : एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा शहरात धावत असल्याचा प्रकार रविवारी मध्यवर्ती बस स्थानकासमोर उजेडात आला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी एक ऑटोरिक्षा जप्त केला असून, चौकशी सुरू केली आहे.
जुने शहरात राहणारे प्रभाकर दखणे यांचा एमएस-३०- इ-८९५ या क्रमांकाचा ऑटोरिक्षा आहे. त्यांच्याकडे ऑटोरिक्षाचे दस्तावेजही आहेत. काही दिवसांपूर्वी दखणे यांना एमएच-३०-इ-८९५ या क्रमांकाच्या दुसर्या ऑटोरिक्षातून शहरात प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी ऑटोरिक्षा चालकाला हटकले. मात्र चालक तेथून पसार झाला. त्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांना ही बाब वाहतूक पोलिसांना सांगण्यास सांगितले.
दरम्यान, रविवारी दखणे यांना मध्यवर्ती बस स्थानकासमोर पुन्हा त्याच क्रमांकाचा ऑटोरिक्षा दिसला. त्यांनी ही बाब वाहतूक पोलिसांना सांगितली. वाहतूक पोलिसांनी सिटी कोतवाली पोलिसांना कळविले. कोतवाली पोलिसांनी दोन्ही ऑटोरिक्षांच्या चालकांची चौकशी केली. दस्तावेज तपासल्यानंतर दखणे यांचा ऑटोरिक्षा सोडून दिला. मात्र दुसर्या ऑटोरिक्षाचालक सैय्यद साजिदकडे दस्तावेज नव्हते. दस्तावेज आणून देतो, असे म्हणत त्याने तेथून पळ काढला.