कारची काच फोडून अडीच लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:29 IST2018-01-06T23:29:07+5:302018-01-06T23:29:45+5:30
कारची काच फोडून २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले.

कारची काच फोडून अडीच लाखांचे दागिने लंपास
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कारची काच फोडून २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. मालवीय चौक ते चित्रा चौक दरम्यान ही घटना गोपाल किराणापुढील मार्गावर घडली. शिरजगाव कसबा येथील सुवर्ण व्यावसायिक प्रदीप तारेकर हे शुक्रवारी एमएच २७ बीई-०९९६ कारने अमरावतीत आले होते. त्यांनी सराफा बाजारात काही दागिने खरेदी, तर काही दुरुस्त केले.
काच फुटली; बॅग लंपास
सराफा बाजारातील काम आटोपल्यानंतर त्यांनी कारमध्ये हा ऐवज ठेवला. तेथून परत येत असताना त्यांनी स्केटिंग बूट खरेदीसाठी ईलाइट स्पोर्ट या प्रतिष्ठानासमोर मार्गावर कार थांबविली. प्रदीप तारेकर हे बूट खरेदीसाठी दुकानात गेले त्यावेळी कारमध्ये चालक बसला होता. मात्र, तो लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधत अज्ञात चोराने कारची काच फोडून आतील बॅग लंपास केली. प्रदीप तारेकर व चालक परत कारजवळ आल्यावर त्यांना काच फुटलेली आणि बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले.