राजुरा येथे दोन कृषिसेवा केंद्रे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST2021-07-01T04:10:35+5:302021-07-01T04:10:35+5:30

राजुरा बाजार : स्थानिक बाजारपेठेत बुधवारी रात्री दोन कृषिसेवा केंद्रांचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी येथून किरकोळ ...

Two agricultural service centers were blown up at Rajura | राजुरा येथे दोन कृषिसेवा केंद्रे फोडली

राजुरा येथे दोन कृषिसेवा केंद्रे फोडली

राजुरा बाजार : स्थानिक बाजारपेठेत बुधवारी रात्री दोन कृषिसेवा केंद्रांचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी येथून किरकोळ साहित्य लंपास केले.

पोलीस सूत्रांनुसार, पहाटे २.४० च्या सुमारास तीन चोरट्यांनी राहुल सोनारे यांचे राहुल कृषिसेवा केंद्र व काळे यांचे गुरुदेव कृषिसेवा केंद्र या दोन प्रतिष्ठानांचे शटर वाकवून आता प्रवेश केला. किरकोळ रक्कम व कीटकनाशकांचे डबे लंपास करण्यात आल्याची तक्रार वरूड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. चोर मध्य प्रदेशातील असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मुख्य म्हणजे, राज्य महामार्गावरील या गावात चोऱ्यांचे नावीन्य नाही. यापूर्वीही दोन कृषिसेवा केंद्रे चोरट्यांनी लक्ष केली होती. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार चौगावकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार दीपक जाधव, सुमीत विडेकर करीत आहेत.

Web Title: Two agricultural service centers were blown up at Rajura