बटाऊ वाले हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत
By Admin | Updated: November 19, 2015 00:53 IST2015-11-19T00:53:06+5:302015-11-19T00:53:06+5:30
अमित हत्याकांडातील तब्बल तीन महिन्यापासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

बटाऊ वाले हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत
अमरावती : अमित हत्याकांडातील तब्बल तीन महिन्यापासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या हत्याकांडात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या १५ झाली आहे.
बारुद गँगनी ११ आॅगस्ट रोजी भर रस्त्यावर अमित बटाऊवाले या युवकांची हत्या करुन त्याचे वडील मोहन ह्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर टप्प्या टप्प्यानी पोलिसांनी आरोपींना अटक केले. परंतु पप्पू पठाण, मो. आदील मो. अशफाक, मो. जाफर, लकीअली, मो. माजीत, मो. अश्फाक इत्यादी पाच आरोपी फरार होते. ते सारखे पोलिसांना हुुलकावनी देत होते. पप्पू, लकी व माजीत ह्यांना आठ दिवसापूर्वी मुंबई जवळ भिवंडी येथे शांतीनगर पोलिसांनी अटक केली होती.
मंगळवारी संध्याकाळी मो. आदील मो. अनवर व बुधवारी सकाळी मो. अश्फाक मो. जाफर या दोघांना पोलीस उपनिरीक्षक अजय आकरे आदींनी सापळा रचून शिताफीने अटक केली. मो. आदील हा चोरून लपून कासदपूऱ्यात घरी येत असतो, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांनी दिली होती. पोलीस दुपारपासूनच त्याच्यावर नजर ठेवून होते. घराभोवती सापळा रचून दुपारी ४ वाजता अटक केली.