पाण्याची टाकी भरली की विद्युत पुरवठा आपोआप बंद !

By Admin | Updated: May 28, 2016 00:10 IST2016-05-28T00:10:46+5:302016-05-28T00:10:46+5:30

पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी 'लोकमत'द्वारे राबविल्या जाणाऱ्या जलमित्र अभियानाला ग्रामीण भागातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Turned off the water supply that automatically turn off! | पाण्याची टाकी भरली की विद्युत पुरवठा आपोआप बंद !

पाण्याची टाकी भरली की विद्युत पुरवठा आपोआप बंद !

जलमित्रची कल्पकता : पाणी बचतीसाठी अनोखा, अनुकरणीय फंडा
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी 'लोकमत'द्वारे राबविल्या जाणाऱ्या जलमित्र अभियानाला ग्रामीण भागातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छतावरील पाण्याची टाकी भरल्यानंतर आपोआप विद्युत पुरवठा बंद होणारे उपकरण येथील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने तयार केले आहे़
सध्या अर्धाअधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे़ त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनासह सर्वसामान्य जनतेसोबतच राजकीय पुढाऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेतला आहे़ दैनंदिन पाणी वापरताना पाण्याचे नियोजन होत नसल्याने दुष्काळाची स्थिती उदभवली आहे. दुष्काळाची दाहकता ओळखून येथील सागर प्रभाकर मानकर या विद्यार्थ्याने पाण्याचा स्तर सिमित ठेवणारे यंत्र तयार केले आहे़ या यंत्रामुळे पाण्याची व विजेची प्रत्यक्ष बचत होत आहे. येथील राजधानीनगर परिसरात राहणारा सागर मानकर याने गोंदिया येथील महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले़
सद्यस्थितीत भेडसावणारी पाण्याची समस्या व दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन धामणगाव शहरात या ‘वॉटर लेव्हल कंट्रोलर’ यंत्राचा उपयोग अनेक नागरिक करीत आहेत. पाण्याची टाकी भरली की, विद्युत पुरवठा आॅटोमॅटिक बंद करणारे हे यंत्र दीर्घकाळ टिकणारे असून सौरऊर्जेचा वापर या यंत्रासाठी करता येतोे. आर्थिक बाजू आणि सर्व सामान्यांचा विचार करून हे यंत्र घरगुती विजेवर चालविता येऊ शकते़ घरातील पाण्याच्या स्टार्टरजवळ हे यंत्र बसविले जाऊ शकते़ घराच्या दुसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर पाण्याची टाकी असली तरी त्या टाकीमध्ये सेन्सरद्वारे पाण्याची पातळी निश्चित केली जाते़ टाकी पूर्णपणे पाण्याने भरली तर घरातील मोटरपंप आपोआप बंद होतो.
टाकीतील पाणी संपणार असेल तर मोटारपंप पूर्ववत सुरू होतो. पाण्याची टाकी भरताना आॅटोमॅटिक लेव्हल कन्ट्रोल तयार होते़ हे यंत्र तयार करण्यासाठी आयसी, रजिस्टर, ट्रान्जीस्टर, बॅटरी, बजर, सेन्सर, वायर या सहित्याचा उपयोग केला जातो़

Web Title: Turned off the water supply that automatically turn off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.