बंदीजनांनी घेतला तुळस रोपवनाचा ध्यास

By Admin | Updated: September 14, 2016 00:12 IST2016-09-14T00:12:28+5:302016-09-14T00:12:28+5:30

ज्या हाताला गुन्हेगारीचा कलंक लागला, आता तेच हात पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले आहेत.

Tulsus lizards taken by the captives | बंदीजनांनी घेतला तुळस रोपवनाचा ध्यास

बंदीजनांनी घेतला तुळस रोपवनाचा ध्यास

पर्यावरण संवर्धन : स्वागत तुळस रोपाने होणार
अमरावती : ज्या हाताला गुन्हेगारीचा कलंक लागला, आता तेच हात पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदजनांनी तुळस रोपवनाचा संकल्प घेतला आहे. ‘एक कैदी, एक तुळस’ हा जागर चार भिंतीच्या आत सुरू आहे. टाकाऊ दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर तुळस रोपवनांसाठी केला जाणार आहे, हे विशेष.
तुळस रोपाचे आयुर्वेदात अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळसीचे दोन पाने खाल्ली की, खोकला, घशातील आजार दूर होतात. तुळस रापटे हे पर्यावरण संवर्धनासाठी लाभदायक ठरते. तुळसाचे एक रोपटे काय किमया करु शकते, ही बाब कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी जाणली आहे. कारागृहाचा आत केवळ गुन्हेगारच नव्हे तर पर्यावरणाशी बांधिलकी जोपासणारी व्यक्तीही आहेत, हे सिद्ध करण्यासाठी अधीक्षक ढोले यांनी कारागृह परिसर तुळसमय करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या निसर्गप्रेमाला बंदीजनांनीदेखील सकारात्मक घेतले. तुळस रोपटे जगविण्याचा मानस त्यांनी व्यक्त करताच शेकडो बंदी पुढे आलेत. पर्यावरण सुरक्षित तर आपण सुरक्षित असे म्हणत बंदीजनांनी तुळस रोपवन जगविण्याचा संकल्प घेतला. संतोष नरोटे, गोपीचंद खजुरे, श्रीकृष्णा बघे, शाम नेतनराव यांच्यासह अनेक बंदीजन तुळस रोपवनासाठी पुढे आले. त्यांनी प्रत्येकी १०० तुळस रोपवन जगविण्याचा सकल्प केला. प्रायोगिक तत्त्वावर तुळस रोपवन तयार केले जाणार असून कारागृहात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला तुळस रोपटे स्वागतादरम्यान भेट म्हणून दिले जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे बंदीजनांमध्ये आनंद संचारला आहे. यासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी पी.एस. भुसारे, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, शरद माळशिकारे, रेवनाथ कानडे, संजय गणोरकर, सुभेदार तिवस्कर, राठोड, भूषण कांबळे आदींनी मोलाचे सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)

दुधाच्या टाकाऊ पिशव्यांचा वापर
कारागृहात दरदिवशी शेकडो दुधाच्या टाकाऊ पिशव्या निघतात. त्यामुळे या टाकाऊ प्लास्टिक पिशव्यांत तुळस रोपवनाचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. या पिशव्या कचऱ्यात टाकण्याऐवजी ाात तुळस रोपटे जगविले जाणार आहे. बंदीजनांच्या हाताला तुळस जगविण्याचा आनंद असून हे रोपटे भविष्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्धदेखील केले जाणार आहे.

पर्यावरणाच्या असमतोलाने नुकसानीच्या घटना घडत आहे. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.तुळस हे पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त असल्याने कारागृहात त्याचे संगोपन केले जाणार आहे.
- भाईदास ढोले,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह

Web Title: Tulsus lizards taken by the captives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.