शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट

By admin | Updated: August 6, 2016 00:11 IST

यावर्षीच्या पहिल्याच हंगामात अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसला आहे.

१५ गावांना फटका : शेतकऱ्यांची झाली निराशाटाकरखेडा संभू : यावर्षीच्या पहिल्याच हंगामात अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसला आहे. टाकरखेडा संभू परिसरात साऊर, कळमगव्हाण, रामा, आष्टी, देवरी, जळका हिरापूर, मार्की मक्रमपूर, वायगाव, कामनापूर, जावरा, चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर, कृष्णापूर, तळवेल, जवळा शहापूर आदी गावांमध्ये काही शेतकऱ्यांना दोन महिन्यांत दोन ते तीन वेळा तुरीची पेरणी करावी लागली. परंतु तेही हाती लागले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी पेरणीयोग्य पाऊस येणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु ओल्या दुष्काळाने निराशा केली. पहिल्या पावसात जूनमध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्यापूर्ण केल्यात. परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे बियाणे जळाले. त्यानंतर लगेच काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या केल्या आहेत. परंतु त्याही हाती लागल्या नाही. जेमतेम पीक निघाले होते. त्यावर पाण्याचे तळे साचल्याने तेही जळून गेले. पावसाचा अंदाज घेऊन एक संधी देण्याचे शेतकऱ्याने पुन्हा धाडस करून तुरीची पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे त्याचाही बीमोड झाला. या परिसरातील काही शेतकऱ्यांना दुबार, तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. मागील तीन वर्षांपासून नापिकाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा डोंगर असताना या नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, या आशेवर शेतकरी आहे. याच बरोबर उडीद, मूग, सोयाबीनच्या उत्पादकांनादेखील या अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला. याचे सर्वाधिक नुकसान भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू, साऊर, कळमगव्हाण, रामा, आष्टी, देवरी, जळका हिरापूर, मार्की मक्रमपूर, वायगाव, कामनापूर, जावरा, चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर, कृष्णापूर, तळवेल, जवळा शहापूर आदी गावांमध्य आहे. (वार्ताहर)