शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:11 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकारावर टाच : कृषी, बांधकाम, नोकर भरतीचे अधिकार शासनस्तरावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.ग्रामविकास विभागाने मागील काही वर्षात पंचायतराज व्यवस्थेत शीर्ष संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली आहे. देशातील पंचायतराज संस्थांना अधिक अधिकार मिळावे, या उद्देशाने केंद्रशासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरुस्ती केली. राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे, ते अधिकार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी मिळावे, हा घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार राज्यातील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षित होते प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय तेही अंशत: झेडपीला दिले होते.त्यापैकी काही अधिकार हळूहळू सरकार परत घेत आहे. विशेष म्हणजे यंदा ७३ व्या घटनादुरुस्तीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरुस्तीनुसार सर्व अधिकार मिळतिल, या आशेवर असलेल्या झेडपी पदाधिकाऱ्यांना अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे. पंचायत राज व्यवस्थेतून ग्राम विकास आणि तळागाळातील जनतेला राजकीय सत्तेत भागीदारी मिळावी यासाठी या व्यवस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली त्यानंतर २०१४ मध्ये सत्तापालट झाली.सरकारने सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या अस्तित्वाला पंख छाटणारे निर्णय घेतले जात असल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.रस्ते निर्मिती, शिक्षकांच्या बदल्याही शासनस्तरावरजिल्हा परिषदेच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला .पदभरती शासन करणार तर शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून होतात. वस्तू खरेदीसाठी ठराविक कंत्राटदारांची निवड करून त्यांच्याकडून खरेदीचे बंधनही घालण्यात आले.सेस फंडापुरते कृषी विभागाचे अस्तित्व!जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेली कृषी सेवा केंद्र परवाना ,बियाणे विक्री परवाना ,कीटकनाशक विक्री परवाना, कृषी अभियांत्रिकी योजना राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्या तर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत बळकटीकरण हस्तांतरित झाली आहे.