कैद्यांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

By Admin | Updated: June 16, 2016 00:39 IST2016-06-16T00:39:05+5:302016-06-16T00:39:05+5:30

अमरावती मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कैद्यांना जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी कारागृह व पोलीस प्रशासनाने प्राधान्य द्यावे,

Try to get the prisoners fast | कैद्यांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

कैद्यांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

चव्हाण : जिल्हा न्यायाधीशांच्या कक्षात बैठक
अमरावती : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कैद्यांना जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी कारागृह व पोलीस प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हा व सत्र न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.
येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांच्या खासगी कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. न्यायालयीन कैद्यांना त्यांच्या गरजेनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत दक्षता घ्यावी, असे सांगून पोलीस, कारागृह प्रशासन यांना जागरूक राहण्याच्या सूचना केल्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यायालयीन कैद्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व सुविधा, वैद्यकीय सेवेचा दर्जा, पोलीस व कारागृह प्रशासनाकडून न्यायालयीन कैद्यांच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाच्यावतीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजागरण मोहीम आयोजित करण्यासाठी लोकन्यायालय, कायदेविषयक शिबिरे घेणे, जाहिरात फलकाद्वारे माहिती देणे, हस्तपत्रके, भित्तीपत्रिका, पथनाट्य आदी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी दिवाणी न्यायाधीश ओझा, पी.एस. गणोरकर, विधी महाविद्यालय प्रा.पी.वाय. दाभाडे, सहायक पोलीस आयुक्त ए.जे. पंडागळे, व्ही.पी. कोडापे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आर.के. कानडे उपस्थित होते.

Web Title: Try to get the prisoners fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.