तुरीच्या पेंड्या पेटविल्या, ६० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:27+5:302021-02-05T05:27:27+5:30
अमरावती : शेतात सवंगणी करून ठेवलेल्या तुरीच्या पेंड्यांना खोडसाळपणाने अज्ञात आरोपीने आग लावल्याने फिर्यादी यांचे ६० हजारांचे नुकसान झाले. ...

तुरीच्या पेंड्या पेटविल्या, ६० हजारांचे नुकसान
अमरावती : शेतात सवंगणी करून ठेवलेल्या तुरीच्या पेंड्यांना खोडसाळपणाने अज्ञात आरोपीने आग लावल्याने फिर्यादी यांचे ६० हजारांचे नुकसान झाले. ही घटना वडगाव जिरे येथे रविवारी घडली. फिर्यादी विलास दत्ताजी जेवडे (४५, रा. वडगाव जिरे) यांनी तक्रार नोंदविली. पोलिसानी गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------------------------
लक्ष्मीनगरातून दुचाकी चोरी
अमरावती : येथील लक्ष्मीनगरातून ३० हजार रुपये किमतीची एमएच २७ बीएम ०२०० दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सोमवारी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिर्यादी वेदांत रामकुमार जयस्वाल (२५, रा. न्यू कॉर्टन लक्ष्मीनगर) यांनी तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------
प्रवीणनगरातून दुचाकी चोरी
अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील प्रवीण नगरातून ३५ हजार रुपये किमतीची एमएच २७ बीके ६७५७ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी फिर्यादी फरदिन खान फिरोज खान (२१, रा. प्रवीणनगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.