खरे लाभार्थी घरकुलापासून दूरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 04:08 IST2017-01-23T04:08:20+5:302017-01-23T04:08:20+5:30
ज्यांनी आयुष्यभर घराचे स्वप्न पाहिले, असे अनेक पात्र लाभार्थी आयुष्याच्या संध्याकाळीही शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील

खरे लाभार्थी घरकुलापासून दूरच!
अमरावती : ज्यांनी आयुष्यभर घराचे स्वप्न पाहिले, असे अनेक पात्र लाभार्थी आयुष्याच्या संध्याकाळीही शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांपासून वंचित आहेत. त्यामुळे अजूनही ते घराविना हालअपेष्टांचे जीवन जगत आहेत. अनेकांनी घर मिळविण्यासाठी अर्ज केला. त्यातून सर्वांना घरे देण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे. मध्यंतरी घरोघरी सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले.