ट्रक-एसटीची धडक,२२ जखमी
By Admin | Updated: August 2, 2016 00:00 IST2016-08-02T00:00:03+5:302016-08-02T00:00:03+5:30
नजीकच्या चमकुरा धाब्याजवळ एसटीने रेतीच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एसटीतील २२ प्रवासी जबर जखमी झालेत.

ट्रक-एसटीची धडक,२२ जखमी
चमकुरा धाब्यानजीक अपघात : रेती वाहून नेत होता ट्रक
चांदूररेल्वे : नजीकच्या चमकुरा धाब्याजवळ एसटीने रेतीच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एसटीतील २२ प्रवासी जबर जखमी झालेत. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
एसटी क्र. एम.एच.२७ ए.क्यू.६२४० ही चिमूर आगाराची अमरावती ते अहेरी ही बस चांदूर रेल्वे मार्गे जात होती. त्याच रस्त्यावरुन विरुद्ध दिशेने अमरावतीकडे रेतीने भरलेला टिप्पर क्रमांक एम.एच.४०-ए. ६६३१ जात होता. भरधाव एसटी दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकवर जावून आदळली. या अपघातात एसटीमधील २२ प्रवासी जखमी झालेत. तर चालक-वाहकांना सुद्धा जबर दुखापत झाली. सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात
आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गिरीश बोबडे व फौजदार डोंगरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. या अपघाताची पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.