ट्रक नदीत उलटला
By Admin | Updated: October 19, 2015 00:35 IST2015-10-19T00:35:05+5:302015-10-19T00:35:05+5:30
नागपूर- औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेस हायवेची दुरूस्ती अनेक वेळा करण्यात आली असली तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या ...

ट्रक नदीत उलटला
कासारखेड येथील घटना : खड्ड्यांचा अडथळा
धामणगाव रेल्वे : नागपूर- औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेस हायवेची दुरूस्ती अनेक वेळा करण्यात आली असली तरी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यांत या रस्त्यावर खड्डे पडतात. शनिवारी खड्डे चुकविताना एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक नदीत कोसळला़
देवगाव ते पुलगावपर्यंत या सुपर एक्स्प्रेस हायवेच्या रस्त्यांच्या मधोमध मोठी खड्डे पडले आहे़ अनेक वेळा दुरूस्ती करूनही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यंत जैसे थे अवस्था या रस्त्यांची होत असल्याची पहायला मिळत आहे.
शनिवारी नागपूर येथून औरंगाबादकडे एम़एच़१५ डी़जे़ ७४ ३५ हा ट्रक सिमेंट चुना घेऊन जात असताना रायपूर कासारखेड परिसरातील पुलावरील खड्डे चुकवित असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक नदीत कोसळला. या घटनेत दोघे जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (तालुका प्रतिनिधी)