शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

ट्रक उलटून वाहकासह ९० शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

भोपाळहून हैद्राबादकडे बकऱ्या व मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एमपी ०४ जीबी १४८३ या ट्रकमध्ये २३० शेळ्यांची दाटीवाटीने वाहतूक केली जात होती. गाडेगावनजीकच्या वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमध्ये चालकासह पाच जण होते.

ठळक मुद्देभीषण अपघात : वरूड तालुक्यातील गाडेगावलगतची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : भोपाळहून हैद्राबादकडे बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला गाडेगावनजीक अपघात झाला. यात ९० शेळ्यांसह ट्रकवाहकाचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बेनोडा शहीद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.भोपाळहून हैद्राबादकडे बकऱ्या व मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एमपी ०४ जीबी १४८३ या ट्रकमध्ये २३० शेळ्यांची दाटीवाटीने वाहतूक केली जात होती. गाडेगावनजीकच्या वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमध्ये चालकासह पाच जण होते. त्यापैकी बंकरलाल बन्सीलाल (३०, रा. बिनगंज, मध्यप्रदेश) हा बकऱ्यांसोबत होता. चालक शिवम मुरली गिरी (२४, बेरसिया, ता. गुना), हेमंत राजू खाटीक (३०, रा. बरसत ता. गुना), हेमराज नारायण तंवर (३२, रा.राजस्थान), इम्रान बेग नसीम बेग (रा. गुना मध्यप्रदेश) हे चौघे ट्रकच्या केबिनमध्ये होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून शेळ्या व मेंढ्या ट्रकखाली दबल्या. यात ९० शेळया मृत्यूमुखी पडल्या. बंकरलाल बन्सीलाल हासुद्धा जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती रस्त्यावरून ये-जा करणाºयांनी बेनोडा शहीद पोलिसांना दिली. हेडकॉन्स्टेबल शशिकांत पोहरे व संतोष आवडकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालय वरूड येथे पाठविण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात