ट्रकची भींतीला धडक, एक मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:41+5:302021-06-16T04:16:41+5:30
अमरावती : भरधाव ट्रकने कोंडेश्वर मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यानंतर ट्रक पांदण रस्त्यावर उलटला. यात ...

ट्रकची भींतीला धडक, एक मजूर ठार
अमरावती : भरधाव ट्रकने कोंडेश्वर मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यानंतर ट्रक पांदण रस्त्यावर उलटला. यात दोन मजूर जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघात रविवारी घडला.
ट्रक क्रमांक एमएच ३० एबी ०४८४ व ट्रक क्रमांक एमएच ३० एबी ०१३७ च्या चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४(अ),२७९, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. यात प्रकाश महादेव चोरमल (६०) यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महावितरणचे अधिकारी फिर्यादी संदीप कमलाकर विटाळकर (४०, रा. दत्तविहार कॉलनी साईनगर) यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली. ट्रक क्रमांक एमएच ३० एबी ०४८४ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणाने चालवून भिंतीला धडक दिली. तसेच ट्रक क्रमांक एमएच३० एबी ०१३७ ने ट्रकच्या चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून भिंतीच्या जवळून ट्रक नेला. त्यामुळे भिंतीला दबाव आला व ती ढासळली. चालकाचे नियंत्रस सुटल्याने या अपघातात ट्रक पादंन रस्त्यावर उलटला. यामध्ये दोन मजूर जखमी झाले. त्यापैकी प्रकाश चोरमल यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश मारोडकर करीत आहेत.