ट्रकचालकास झाडाला बांधून मारहाण

By Admin | Updated: September 22, 2015 00:33 IST2015-09-22T00:33:23+5:302015-09-22T00:33:23+5:30

देशी दारुच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकास चार हल्लेखोरांनी बेदममारहाण करुन तसेच त्याला झाडाला ...

Truck driver crush bark | ट्रकचालकास झाडाला बांधून मारहाण

ट्रकचालकास झाडाला बांधून मारहाण

मंगरुळ चव्हाळा येथील घटना : १२ लाखांची देशी दारू लंपास
मंगरुळ चव्हाळा : देशी दारुच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकास चार हल्लेखोरांनी बेदममारहाण करुन तसेच त्याला झाडाला बांधून ट्रकसह १२ लाख रुपयांचा माल घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नांदगावखंडेश्वर तालुुक्यातील मंगरुळचव्हाळा येथील साखळी नदीजवळ घडली.
मंगरुळ चव्हाळा ते शिंगणापूर या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकास अज्ञात चार इसमांनी थांबवून त्याला प्रथम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रस्त्यालगतच्या पळसाच्या झाडाला बांधून बेदम मारहाण केली. ट्रकमध्ये १०५० देशीदारुच्या पेट्या होत्या. दारुची किंमत १२ लाख रुपये होती. शेख ईब्राहीम शे.बब्बु(३५ रा. आझाद कॉलनी, दिघोरी नागपूर) हा ट्रकचालक ट्रक घेऊन नागपूरकडे जात होता. त्याला मंगरुळ चव्हाळ्याजवळ चार इसमांनी हात दाखवून थांबविले. ट्रकचालक खाली उतरताच त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला साखळी नदीच्या पात्रालगत असणाऱ्या पळसाच्या झाडाला बांधून ठेवण्यात आले. सकाळी चालकाने आरडाओरड केली असता मंगरुळ चव्हाळा येथील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच शेख ईब्राहीम जवळ गेले. त्याला बांधून ठेवल्याचे पाहून काही नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. ही माहिती नांदगाव खंडेश्वर पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार शैलेश शेळके यांनी तत्काळ पोलिसांचे पथक ट्रकच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. अधिक तपास नांदगाव पोलीस करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Truck driver crush bark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.