ट्रकने महिलेस चिरडले, कारचालकावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 9, 2015 00:10 IST2015-09-09T00:10:23+5:302015-09-09T00:10:23+5:30

उभ्या कारचे दार उघडल्याने वृध्द दाम्पत्याची दुचाकी कारच्या दारावर आदळली.

The truck crushed the woman, the crime branch filed a complaint | ट्रकने महिलेस चिरडले, कारचालकावर गुन्हा दाखल

ट्रकने महिलेस चिरडले, कारचालकावर गुन्हा दाखल

एक जखमी : मुधोळकर पेठजवळील घटना, रस्त्यावर कार उभी केल्याने अपघात
अमरावती : उभ्या कारचे दार उघडल्याने वृध्द दाम्पत्याची दुचाकी कारच्या दारावर आदळली. या अपघातात ते दाम्पत्य मार्गावर कोसळताच वृध्द महिला समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मुधोळकर पेठ परिसरातील महात्मा फुले विद्यालयासमोर घडली.
या अपघातात शारदा सुदाम भोसले (५५) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती सुदाम भोसले (६०, रा. दोन्ही राहणार आंैरंगपुरा) जखमी झाले.
भोसले दाम्पत्य दुचाकीने राजापेठ चौकाकडे जात होते. महात्मा फुले विद्यालयासमोर उभी असणारी कार एमएच-२७-बीई-२५६१ मार्गालगत उभी होती. याचवेळी भोसले दाम्पत्यांची दुचाकी तेथून जात असताना अचानक कार चालकाने कारचा दार उघडले. त्यामुळे भोसले दाम्पत्यांची दुचाकी अचानक कारवर धडकली. हा अपघात घडतात भोसले दाम्पत्य मार्गावर कोसळले. विरुध्द दिशेने जाणाऱ्या महापालिकेच्या ट्रकने शारदा भोसले यांना चिरडले. यामध्ये शारदा भोसले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदाम भोसले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी जखमीला इर्विन रुग्णालयात आणले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकांला अटक केली आहे.

Web Title: The truck crushed the woman, the crime branch filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.