ट्रकने पादचाऱ्यास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:35 IST2018-10-23T23:34:51+5:302018-10-23T23:35:07+5:30
मजुरीचे काम आटोपून पायी घरी जाणाऱ्या एका कामागारास भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडावूनसमोर घडली.

ट्रकने पादचाऱ्यास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मजुरीचे काम आटोपून पायी घरी जाणाऱ्या एका कामागारास भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडावूनसमोर घडली. काशीराम चिपाल शेलुकार (२०,रा.चिखलदरा) असे मृताचे नाव आहे. या अपघात प्रकरणात बडनेरा पोलिसांनी चालक गोरखनाथ दशरथ भगत (४०,रा.हमालपुरा) याला अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, काशीराम शेलुकार हा सोमवारी रात्री मजुरीचे काम आटोपून अमरावतीकडून बडनेराकडे जाणाºया मार्गावरून पायी जात होता. दरम्यान अमरावतीहून बडनेºयाकडे जाणाºया ट्रक क्रमांक एमएच ११ एम-५२०९ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून काशीरामला धडक देत चिरडले. या अपघातानंतर चालक ट्रक घेऊन पसार झाला. या भीषण अपघातात काशीरामच्या चेहºयावरून ट्रकचे चाक गेल्याने ते चेंदामेंदा झाले होते. याशिवाय हातपायसुद्धा मोडले होते.
काशीरामचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. घटनास्थळी नागरिकांनी संतापही व्यक्त केला. या घटनेच्या माहितीवरून बडनेºयाचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय आत्राम यांच्या पथका घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह इर्विन रुग्णालयात हलविला. पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेत ट्रकचा मागोवा घेत चालकास ताब्यात घेतले. या अपघाताची तक्रार विनोद सुखुलाल जामुनकर(२६,रा.चिखलदरा) याने बडनेरा पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक गोरखनाथ भगतविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.