अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: December 9, 2015 00:24 IST2015-12-09T00:24:54+5:302015-12-09T00:24:54+5:30

धारणी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर नवनिर्मित कार्यकारिणीची पहिली विशेष सभा विविध कारणांनी गाजली. ३० नोव्हेंबरला पहिल्या ....

Troubleshooting the encroachment campaign | अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह

अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह

धारणीतील अतिक्रमण : ४१ ऐवजी ३६ फुटांच्या रस्त्याचा निर्णय
श्यामकांत पाण्डेय धारणी
धारणी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर नवनिर्मित कार्यकारिणीची पहिली विशेष सभा विविध कारणांनी गाजली. ३० नोव्हेंबरला पहिल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिला शक्ती आरुढ झाल्याने जनसामान्यात विकासाच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु ही आशा औटघटकेचा ठरल्याचा प्रत्यय शनिवारी झालेल्या पहिल्याच विशेष सभेत दिसून आले.
१ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्ग असणाऱ्या अमरावती-बुऱ्हाणपूर मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजमाप केले. या मार्गाला कमीत कमी ८२ फुटांपर्यंत मोकळे करण्याचा नगरपंचायतीचाही मानस होता. त्या दृष्टीने प्रशासक कृष्णा भामकर यांनी पत्रे देऊन १४ डिसेंबर रोजी राज्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्तही काढला. परंतु नगरपंचायतीत सत्तारुढ झालेल्या नगरसेवकांना अतिक्रमणमुक्तीचा हा फंडा आवडला नाही. त्यांनी ८२ ऐवजी ७२ फुटापर्यंत रस्ता मोकळा करण्याचा निर्णय नगरपंचायतच्या सभेत घेण्यात आला.
कोणत्याही शहराचा चेहरामोहरा हा तेथील उत्कृष्ट रस्त्याने ओळखला जातो. धारणीतून जाणाऱ्या अमरावती-बुऱ्हाणपूर या मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेपर्यंत बेधूंद अतिक्रमण थाटण्यात आले. कापडी शेड, टीनशेड व त्यासमोर हातठेलावाल्यांचा अवाजवी अतिक्रमणाने हा मार्ग वेढला गेला आहे. त्यातही आॅटो व काळी-पिवळीचालकांसह अवैधरीत्या विना परवाना धावणारे गाड्यांचे मुख्य मार्गावरील अस्तव्यस्त उभ्या राहत असल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे एबी रोड मोकळा करण्याच्या निर्णयाचा जनतेने स्वागत केले होते. मात्र याच मार्गावरील काही नगरसेवकांचे व त्यांच्या नातलगांचे दुकाने अतिक्रमणात येत असल्याने अशा अतिक्रमणधारकांनी महामार्गावरील अतिक्रमणाचा मार्गाचे रुंदी ८२ फुटांवरून ७२ फुटांवर आणण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजीच्या अतिक्रमण मोहिमेला नगरसेवक कितपत सहकार्य करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Troubleshooting the encroachment campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.