तंत्र शिक्षण प्रवेश प्रक्रियेत घोळ
By Admin | Updated: July 11, 2016 00:06 IST2016-07-11T00:06:04+5:302016-07-11T00:06:04+5:30
तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

तंत्र शिक्षण प्रवेश प्रक्रियेत घोळ
शिवसेनेची धडक : आॅनलाईनमुळे भवितव्य धोक्यात
अमरावती : तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ११ जुलै रोजी तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडक देवून ही प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी केली जाणार असल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील खराटे यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली.
आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची कैफियत शिवसेनेने मांडली. खराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्र शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी नियमानुसार आॅनलाईन अर्ज भरताना प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पर्याय दिले जातात. त्यानुसार अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रि येसाठी फ्रीज, स्लॉईड व फ्लोट असे पर्याय होते. मात्र या पर्यायात ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी क्रमांक लागतो, त्या पर्यायात तो लॉक होऊन अन्य त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतो. परंतु आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ असल्यामुळे फ्रीज हा पर्याय निवडून सुद्धा संबंधित विद्यार्थ्यांचे नाव यादीत आले नाही, असे सुनील खराटे यांनी आॅनलाईन प्रवेशासाचे दाखल देत तंत्र शिक्षण विभागाच्या कारभारावर वाभाडे काढले.स्लाईड हा दुसरा पर्याय असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यादीत नाव आले आहे, त्याच महाविद्यालयात निवड झालेल्या ब्रँच प्रमाणे इतर ब्रँचसाठी विद्यार्थी पात्र ठरतो. मात्र अनेकांनी हा पर्याय निवडून आॅनलाईन भरलेल्या अर्जासाठी प्रवेश दाखविले नाहीत. पहिल्या व दुसऱ्या फेरीत घोळ असल्याने अभियांत्रिकी प्रवेशसाठी पात्र १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा खेळ असल्याचे शिवसेनेचे म्हणने आहे.
-तर न्यायालयात जाऊ
तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेतली नाही तर या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसेना घेणार असे सुनील खराटे यांनी सांगितले. संवैधानिक मार्गांने प्रश्न सोडविण्यासाठी अगोदर प्रयत्न असेल. प्रशासनाने ऐकले नाही तर कायदेशीर मार्ग स्वीकारणार, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.