त्रिवेणी, सचिन 'बेस्ट अॅथलीट'
By Admin | Updated: August 29, 2016 00:07 IST2016-08-29T00:07:26+5:302016-08-29T00:07:26+5:30
जिल्हा पोलीस आयुक्तालय शहर पोलीस क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर धाव खेळात बेस्ट अॅथलीटचा बहुमान पोलीस मुख्यालयातील त्रिवेणी व सचिन यांनी मिळविला

त्रिवेणी, सचिन 'बेस्ट अॅथलीट'
क्रीडा स्पर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण
अमरावती : जिल्हा पोलीस आयुक्तालय शहर पोलीस क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर धाव खेळात बेस्ट अॅथलीटचा बहुमान पोलीस मुख्यालयातील त्रिवेणी व सचिन यांनी मिळविला. शनिवारी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते विजेता खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.
शहर क्रीडा स्पर्धेत चार संघांतील ११० खेळाडूंनी एकूण ५५ क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविले. या विविध खेळांच्या स्पर्धेतील विजेत्यांना समारोपीय कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम व शशिकुमार मिना उपस्थित होते. यावेळी १०० मिटर धावण्याची अंतिम स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पोलीस मुख्यालयातील त्रिवेणी व सचिन यांनी लक्ष्य पार केले. त्यानंतर महिलांची संगीत खुर्ची व रस्सीखेच स्पर्धा झाली. परेड संचलन शशिकांत गवई व त्रिवेणी मुख्यालय संघ, मुसाहिद खॉ व स्वप्निका गवई गाडगेनगर संघ, अनिल निर्मळ व आरती ठाकूर राजापेठ संघ, धिरज वानखडे व दर्शना वानखडे फे्रजरपुरा संघांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पीएसआय नितीन थोरात तर आभार मोरेश्वर आत्राम यांनी मानले.