परतवाड्यात शहीद जवानांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:25 IST2019-02-19T22:25:20+5:302019-02-19T22:25:36+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यांना परतवाडा येथील लोकमत सखी मंच सदस्यांनी श्रद्धांजली अर्पित केली.

परतवाड्यात शहीद जवानांना श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यांना परतवाडा येथील लोकमत सखी मंच सदस्यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रगीत म्हटले. यानंतर सखींनी देशभक्तीपर गिते गायिली तसेच जवानांच्या देशभक्तीला सलामी दिली. मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी अपर्णा देशमुख, पल्लवी धर्माधिकारी, सीमा थोरात, तारकेश्वरी चिखले, संयुक्ता देशपांडे, अनिता सदाफळे, नगराध्यक्षा सुनीता फिसके, शीतल डोंगरे, किरण म्हाला यांनी मनोगत व्यक्त केले. सुनंदा मढघे, समृद्धी आष्टीकर, सीमा नागरे यांनी आयोजनाकरिता अथक परिश्रम घेतले.