रविवारी रात्री १२.२० मिनिटांनी वाहणार गाडगेबाबांना श्रद्धांजली
By Admin | Updated: December 20, 2015 00:10 IST2015-12-20T00:10:37+5:302015-12-20T00:10:37+5:30
मानवतेचा पुजारी, दीन-दलितांचा कैवारी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या ५९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ...

रविवारी रात्री १२.२० मिनिटांनी वाहणार गाडगेबाबांना श्रद्धांजली
अमरावती : मानवतेचा पुजारी, दीन-दलितांचा कैवारी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या ५९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गाडगेनगर येथील गाडगेबाबा समाधीस्थळी रविवारी रात्री १२.२० मिनिटांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मौन श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. रात्री ९ वाजतापासूनच गाडगेमहाराजांच्या जीवनचरित्र्यावर हभप भरत रेडे महाराज यांचे कीर्तन आयोजिले आहे. दरवर्षी श्रध्दांजली कार्यक्रमाला पंचक्रोशितून हजारो भाविक येथे येतात. दोन मिनिटांपर्यंत श्रध्दांजली कार्यक्रम व नंतर मानवेचा थोरसेवक, दीनजणांचा सोहळा हे पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता गाडगेनगर परिसर, राधानगर परिसरातून संत गाडगेबाबांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. २० डिसेंबर १९५६ रोजी रात्री १२.२० मिनिटांनी वलगाव येथील पेढी नदी तिरावर बाबांची प्राणज्योत मालवली होती. दुसऱ्यादिवशी २१ डिसेंबरला त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून गाडगेनगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिरट्रस्टच्या वतीने पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो. (प्रतिनिधी)