स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून भाऊसाहेब देशमुख यांना आगळी श्रद्धांजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:08+5:302021-04-10T04:13:08+5:30
अमरावती : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांकरिता पुस्तकांची निर्मिती करून विद्यार्थांना विनामूल्य उपलब्ध करून देऊन डॉ. पंजाबराव उपाख्य ...

स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून भाऊसाहेब देशमुख यांना आगळी श्रद्धांजली!
अमरावती : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांकरिता पुस्तकांची निर्मिती करून विद्यार्थांना विनामूल्य उपलब्ध करून देऊन डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा शनिवारी होऊ घातलेल्या पुण्यतिथीनिमित्त आगळी आदरांजली अर्पण केली जाणार आहे. हा उपक्रम श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे.
एरवी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जाणारा भाऊसाहेबांचा पुण्यतिथी महोत्सव यंदा कोरोनामुळे घरी राहूनच साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
पुण्यतिथीचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षेची ए बी सी, डी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रकाशित करण्यात आली आहे. हे पुस्तक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार असून, या पुस्तकाच्या माध्यमातून विदर्भातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढावा यासाठी मिशन आयएएस अमरावती यांच्या सहकार्याने हे पुस्तक लोकार्पित करून या पुस्तकाचे वितरण विनामूल्य होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा स्पर्धा परीक्षेसाठी विशेष लाभ होणार आहे. उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर यांनी मिशन आयएएस अकोट येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये यापूर्वी सुरू केले असून त्या ठिकाणी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. या कामासाठी त्यांनी अमरावतीच्या मिशन आयएएसचे सहकार्य घेतले असून भविष्यात देखील वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचा कल वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. प्राध्यापक नरेशचंद्र काठोळे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले असून आहे. यासाठी चिखलीचे प्राचार्य नीलेश गावंडे यांचे सहकार्य लाभले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या इतिहासात असे पुस्तकमय आदरांजली अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.