शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Birsa Munda : आदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही उपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:44 AM

राज्यात विद्यमान २५ आमदार आदिवासी जमातीचे, कधी मिळणार न्याय?

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात आदिवासींमध्ये क्रांतीची ज्योत पेटवून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणारे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. आदिवासींच्या लोकनायकाला कधी न्याय मिळणार, असा प्रश्न त्यांच्या बुधवारी असलेल्या जयंतीच्या अनुषंगाने राज्यातील आदिवासींकडून वेळोवेळी होत आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांची जयंती संपूर्ण देशात आदिवासी बांधव साजरी करतात. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारांवर बाधा येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता.

सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला. त्या दुष्काळात उपासमारी व महागाईने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची नि:स्वार्थ अंत:करणाने सेवा केली. ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन उभे केले. त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता. अनेक प्रसंगांतून आदिवासींवरील जाच असह्य झाल्याने सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने पारंपरिक तीर-कमठा, भाले यांच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढविले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी ब्रिटिश त्यांच्या मागे लागले. सन १९०० मध्ये बिरसा मुंडा डोमवाडी पहाडावर आदिवासी जनतेला मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याने हल्ला चढविला. तेथून ताब्यात घेतल्यानंतर रांची कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे अनन्वित छळ झाल्याने त्यांचे निधन झाले.

आदिवासी आमदार पुढाकार घेणार का?

देशातील झारखंड, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांतील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले दैवत मानतो. झारखंड राज्यात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिकारकाच्या नावाने सुरू करण्यात आली नाही. राज्यात आज २५ आदिवासी आमदार आहेत. त्यांनी पुढाकार घेतला, तर बिरसा मुंडा यांच्या नावाने योजना सुरू करण्यास सरकारला अवधी लागणार नाही. आता आदिवासी आमदार कधी पुढाकार घेणार, असा सवाल आदिवासींच्या संघटनेने केला आहे.

धामणगावातील दोन हजार कार्यकर्ते जाणार नागपूरला

आदिवासी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन हजार आदिवासी कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत.

इतर राज्यात बिरसा मुुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना नाही. जयंतीच्या दिवशी शासकीय सुटी, शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास तेच बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन ठरणार आहे.

- माणिक तोडसाम, ज्येष्ठ कार्यकर्ते, आदिवासी समाज संघटना

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाSocialसामाजिकAmravatiअमरावती