आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येक दिवशी विज्ञान, शास्त्रज्ञांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:05+5:302021-02-05T05:29:05+5:30

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि भारतीय शास्त्रज्ञांची माहिती अवगत व्हावी, ...

Tribal students will get information of science and scientists every day | आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येक दिवशी विज्ञान, शास्त्रज्ञांची माहिती

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येक दिवशी विज्ञान, शास्त्रज्ञांची माहिती

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि भारतीय शास्त्रज्ञांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विज्ञान दिनदर्शिका हा नवा उपक्रम राबविला जाणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी विज्ञान, शास्त्रज्ञांची माहिती शिक्षक देणार आहेत. अमरावती अपर आयुक्तालयांतर्गत धारणी, अकोला, किनवट, पुसद, नांदेड, औरंगाबाद व कळमनुरी एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधीनस्थ आश्रमशाळांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अपर आयुक्त विनोद पाटील यांच्या हस्ते आभासी पद्धतीने विज्ञान दिनदर्शिका उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपायुक्त नितीन तायडे, पुसद येथील प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, सहायक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार, सहायक प्रकल्प अधिकारी विजय पांडे आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून

पहिली ते बारावीपर्यंत वर्गात प्रत्येक दिवशी असलेले विज्ञानाचे महत्त्व आणि शास्त्रज्ञांची माहिती शिक्षक देतील. त्या-त्या दिवसाचे वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात येणार आहे.

---------------

१५० पेक्षा जास्त शास्त्रज्ञांची माहिती

आश्रमशाळांच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विज्ञान शैक्षणिक कॅलेंडरमध्ये ३६५ दिवसांत प्रत्येक दिवशी नव्या, जुन्या शास्त्रज्ञांचा मेळ जुळवून आणला आहे. यात १५० पेक्षा जास्त भारतीय शास्त्रज्ञांची माहिती, छायाचित्रांचा समावेश आहे. वैज्ञानिक उपकरणे आणि त्यांनी लावलेला शाेध हा देखील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा एक भाग बनणार आहे. ही विज्ञान दिनदर्शिका विद्यार्थी, शिक्षकासाठी एक ज्ञानस्रोत नावारूपास येईल, असा आशावाद ‘ट्रायबल’ शिक्षकांनी व्यक्त

केला आहे. त्या-त्या दिवसाचे विज्ञानाचे महत्त्व, माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतील, अशी रचना करण्यात आली आहे.

---------------

कोट

प्रत्येक दिवशी विज्ञान आणि शास्त्रज्ञांचे महत्त्व विषद करणारी ही विज्ञान दिनदर्शिका तयार करण्यात आली. हा ‘ट्रायबल’मध्ये पहिलाच प्रयोग आहे. आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून नक्कीच विज्ञानाची गोडी निर्माण होईल, अशी वेगळी माहिती, छायाचित्रे संकलित करण्यात आली आहेत.

-विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.

Web Title: Tribal students will get information of science and scientists every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.