स्टॅम्प पेपरसाठी आदिवासींच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:16+5:302021-02-05T05:22:16+5:30
फोटो पी ०२ चिखलदरा चिखलदरा : घरकुल योजनेतील करारनामा पत्रासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प पेपरसाठी येथील उप कोषागार कार्यालयात आदिवासींच्या ...

स्टॅम्प पेपरसाठी आदिवासींच्या रांगा
फोटो पी ०२ चिखलदरा
चिखलदरा : घरकुल योजनेतील करारनामा पत्रासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प पेपरसाठी येथील उप कोषागार कार्यालयात आदिवासींच्या रांगा लागल्याचे चित्र सोमवारी होते.
तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी बांधवांना मंजूर प्रतीक्षा यादीनुसार शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, चिखलदरा तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक असल्याने दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील आदिवासींना तालुका मुख्यालय येण्यासाठी शंभर ते दीडशे किलोमीटरचे अंतर कापत यावे लागते. विविध घरकुलांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आवश्यक करारनामा व हमीपत्र भरून देणे गरजेचे असते. त्यासाठी सोमवारी उपकोषागार कार्यालयात स्टॅम्प पेपर घेण्यासाठी आदिवासी ताटकळत उभे होते. उपकोषागार कार्यालयात आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग नसल्याने आदिवासींना नाहक त्रास सहन करावा लागला.
बॉक्स
जिल्हाधिकारी देतील का लक्ष?
१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर व इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गोरगरीब आदिवासींचा हजारो रुपयांचा चुराडा होत आहे. ती सर्व कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यास आदिवासींची आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास वाचूशकेल.
--------------------------------