शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘ट्रायबल’मध्ये शिक्षकांना भरतीनंतरही नियुक्ती आदेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:24 IST

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने पेसा आयद्यांतर्गत जुलै- २०१८ मध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि निरीक्षक असे एकूण ५७ पदांसाठी राबविलेल्या भरतीप्रक्रियेतील पात्र आदिवासी उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश दिले नाहीत.

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने पेसा आयद्यांतर्गत जुलै- २०१८ मध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि निरीक्षक असे एकूण ५७ पदांसाठी राबविलेल्या भरतीप्रक्रियेतील पात्र आदिवासी उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश दिले नाहीत. याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार तोडसाम यांनी पात्र आदिवासी शिक्षकांवरील अन्यायाबाबत ‘ट्रायबल’चे तत्कालीन अपर आयुक्त गिरीश सरोदे यांच्यावर आक्षेप घेतला. पेसा कायद्यांतर्गत विविध पदांची भरतीप्रक्रिया राबवून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, असा निर्णय यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना, ‘ट्रायबल’ अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने ४५ माध्यमिक शिक्षक, ८ उच्च माध्यमिक आणि ४ निरीक्षक पदांसाठी नियमानुसार भरतीप्रक्रिया राबवूनही आदिवासी समाजाच्या पात्र उमेदवारास नियुक्ती देण्यास टाळाटाळ केल्याची बाब आमदार तोडसाम यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

ही भरतीप्रक्रिया नियमसंगत घेण्यात आली आहे. आदिवासी समूहाच्या शिक्षक उमेदवारांची निवड यादी, पात्रता यादी आणि संपूर्ण कागदपत्रांची पडताळणीदेखील करण्यात आली आहे. मात्र, अमरावती अपर आयुक्त कार्यालयाकडून पात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात विलंब का? हा संशोधनाचा विषय असल्याचे आ. तोडसाम म्हणाले. याप्रकरणी आ. तोडसाम यांनी तत्कालीन अपर आयुक्त गिरीश सरोदे यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे. धारणी, अकोला, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी, किनवट व पुसद या सात प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्थ आश्रमशाळांसाठी ही भरती राबविण्यात आली आहे. प्रधान सचिवांना अवगत केले जाईलआदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने आदिवासी समाजातील शिक्षकांसोबत खेळखंडोबा चालविल्याबाबत त्यांना अवगत केले जाईल. शिक्षकांच्या भरती प्रकियेसंदर्भातील वास्तविकता मांडणार असून, येत्या दोन दिवसांत याची दखल आदिवासी आमदारांचे शिष्टमंडळ घेतील, असे आ. तोडसाम म्हणाले.  भरती प्रक्रियेबाबत सर्व सोपस्कार आटोपल्यानंतरही पात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश न देणे ही बाब ‘कोर्ट आॅफ कंटेम्प्ट’मध्ये मोडणारी आहे. तीन दिवसांत नियुक्ती आदेश न दिल्यास आंदोलन केले जाईल.- राजू तोडसाम, आमदार, आर्णी-पांढरकवडा पेसा अंतर्गत झालेल्या भरतीप्रक्रियेत निरीक्षक पदे कायम ठेवली आहेत. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची परीक्षा न झाल्याने ती पदे परीक्षा घेऊनच भरावीत, अशा सूचना प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिल्यात. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.- नितीन तायडे,  उपायुक्त, आदिवासी विकास विभाग अमरावती

टॅग्स :Teacherशिक्षक