वरूड येथे कॉंग्रेस सेवादलाची तिरंगा यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:16 IST2021-08-14T04:16:30+5:302021-08-14T04:16:30+5:30
याप्रसंगी वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक कै. लक्ष्मणराव बेलसरे यांच्या पत्नी विमल ...

वरूड येथे कॉंग्रेस सेवादलाची तिरंगा यात्रा
याप्रसंगी वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक कै. लक्ष्मणराव बेलसरे यांच्या पत्नी विमल बेलसरे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबाराव बहुरूपी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, सीमा सोरगे, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, सदस्य तुषार निकम, सिंधू करणाके, सुधाकर दोड, नरेंद्र पावडे, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाने, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सातपुडा जिनिंगचे माजी अध्यक्ष सुजित पाटील, मनोज इंगोले, राहुल चौधरी, मनीष कुबडे, प्रवीण कुबडे, शेख नासीर शेख बशीर, नेपाल पाटील, अरविंद वानखडे, उद्धव वानखडे, कोमल पांडव, शैलजा वानखडे, सविता काळे, रंजना मस्की, दुर्गा हरले, चंदा ब्राम्हणे, विद्या कुयटे आदी उपस्थित होते.